धक्कादायक ! हिंगोलीत विलगीकरण कक्षात महिलेचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   हिंगोली येथील लिंबाळा येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल केलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. रात्री या सेंटरवर कुणीच नसल्याचा नातेवाईकांचा आरोप असल्याचे निवेदन राष्ट्रीय विराट लोकमंचच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे केला आहे. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे.

विराट लोकमंचने दिलेल्या निवेदनात, दोन दिवसांपुर्वी मध्यरात्री वृद्ध महिलेचा लिंबाळा क्वारंटाईन सेंटरमध्ये मृत्यू झाला आहे. महिलेचे नातेवाईक सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन रात्रीपासून याबाबत सूचना देण्यासाठी आवाज देत होते. परंतू त्याठिकाणी वॉचमन किंवा डॉक्टरची उपस्थिती नव्हते. नातेवाईकांनी तेथे अत्यावश्यक सेवासुद्धा उपलब्ध नसल्याचा आरोप केला असून 28 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला. प्राप्त तक्रारीवरून चौकशी समिती नेमली आहे. त्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाईल, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे. ही महिला झोपेतच दगावली आहे. या सेंटरवर 24 तासांसाठी स्टाफ नियुक्त केलेला आहे. चौकशीत नातेवाईकांच्या म्हणण्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई करू, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.