महाराष्ट्रातील ‘हे’ 3 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात दारूची होम डिलीव्हरी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रात दारूची होम डिलीव्हरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील तीन क्षेत्र वगळता सर्व ठिकाणी दारूची होम डिलीव्हरी केली जाईल, अशी माहिती सरकारने दिली आहे. मुंबई शहर, औरंगाबाद जिल्हा आणि बीडमध्ये दारूची होम डिलीव्हरी केली जाणार नाही, असे सांगण्यात आले. गेल्या 24 तासात, 37200 लोकांना होम डिलिव्हरीद्वारे दारू दिली गेली.

दारूच्या होम डिलीव्हरीसाठी काही नियमही ठरवले गेले आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. दुकानाचा मालक 10 पेक्षा जास्त व्यक्तींना दारू पोहोचविण्यासाठी नियुक्त करू शकत नाही. एका व्यक्तीकडे एकाच वेळी 24 पेक्षा जास्त बाटल्या दारू असू शकत नाहीत. ग्राहकांना दिलासा देत सरकारने दुकानातील मालक बाटलीवर छापलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही असा आदेश दिला.

होम डिलिव्हरीचे उद्धिष्ट म्हणजे दुकानांवरील गर्दी कमी करणे
यापूर्वी अशी माहिती देण्यात आली होती की, ज्याला मद्यपान करण्यास परवानगी आहे केवळ तेच होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर देऊ शकतात. मद्य दुकानांना फोनद्वारे ऑर्डर दिली जाऊ शकते. 5 मेपासून दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. लॉकडाउन नियम शिथिल झाल्यानंतर दारू दुकानांच्या बाहेर गर्दी सुरू झाली होती.अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार दारूच्या दुकानांवरील गर्दी कमी करणे आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे हे होम डिलिव्हरीचे उद्दीष्ट आहे.

या अधिकाऱ्याने सांगितले की, विविध प्रकारची दारू घरी ठेवण्याच्या नियमांची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि ऑर्डर देण्यापूर्वी खरेदीदार ते तेथून पाहू शकतात