अमित शहांचं मोठं विधान, मॉब लिंचिंग गरिबांसोबत, कोणत्या जातीच्या विरूध्द नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मॉब लिंचिंगसंदर्भात मोठे विधान केले आहे. अमित शहा यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले कि, लिंचिंग हे गरिबांसोबत होते, कोणत्याही खास जातीच्या व्यक्तीविरोधात होत नाही. एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. लिंचिंगच्या घटनांना आजकाल मोठा रंग देण्यात येत असून या घटना थांबवण्यासाठी जागरूकता गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून देशभरात या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून झारखंडमध्ये तबरेज अंसारी नावाच्या तरुणाला चोरीच्या आरोपाखाली गर्दीने मारहाण करून त्याची हत्या केली होती. त्याचबरोबर राजस्थानमध्ये पहलू खानची देखील गो तस्करीवरील संशयावरून त्याची हत्या करण्यात आली होती.

बिहारमध्ये नितीश कुमारच असणार एनडीएचा चेहरा –
या मुलाखतीत अमित शहा यांनी मॉब लिंचिंग बरोबरच विविध विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हेच एनडीएचा चेहरा असणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नितीश यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहारमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता –
अमित शहा यांनी यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप राज्यात 288 पैकी 164 जागांवर निवडणूक लढवत असून मित्रपक्ष शिवसेनेला केवळ 124 जागा मिळाल्या आहेत.

यावेळी राज्यात भाजपचे प्रदर्शन कसे राहील या प्रश्नावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले कि, भाजप शिवसेना महायुतीला राज्यात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. तसेच भाजपला किती जागा मिळणार या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले कि, निश्चित आकडा सांगणे कठीण आहे, मात्र मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी येणार आहेत.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी