‘या’ 9 घरगुती उपायांनी दूर करा कमजोरी, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – झपाट्याने बदलत जाणाऱ्या जीवनशैलीमुळे शारीरिक आणि मानसिक ताण वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक आजार उद्भवतात. कमी वयातच अनेक आजार जडू लागल्याने काम करण्याची क्षमता झपाट्याने कमी होत चालली आहे. जे आजार वृद्धपकाळात होत असतात ते हल्ली तरूणांमध्येही आढळून येऊ लागले आहेत. यासाठी शारीरीक आणि मानसिक कमजोरी वेळीच दूर करणे, खूप महत्वाचे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते पुढीलप्रमाणे –

कमजोरी दूर करण्यासाठी खालील उपाय करा –

1) असगंधचे चुर्ण आणि बिदारीकंद 100-100 ग्राम घेऊन त्याचे बारीक चुर्ण तयार करा. दुधामध्ये अर्धा चमचा चुर्ण टाकून सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने अशक्तपणा दूर होईल.

2) डाळिंबाची साल वाळवून बारीक करा. रोज सकाळ संध्याकाळ हे चूर्ण खा. काही दिवसांतच तुम्हाची अशक्तपणाची समस्या दूर होईल.

3) रोज रात्री झोपण्या अगोदर लसुनच्या दोन पाकळ्या खा. तसेच आवळ्याच्या चुर्ण करून त्यात खडीसाखर बारीक करुन मिसळा आणि रात्री झोपताना हे एक चमचा चुर्ण सेवन करा.

4) दोन-तीन काजू आणि दोन बदाम, चार-पाच खारीक 300 ग्रॅम दूधात उकळून घ्या, त्यात दोन चमचे खडीसाखर टाका आणि रोज रात्री झोपताना सेवन करा. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

5) मुलेठी, नागकेशर, बाभळीच्या शेंगा समान प्रमाणात आणि खडीसाखर घेवून हे मिश्रण बारीक करा. याचे5 ग्रॅम सेवन नियमित करा. एक महिना हा उपाय केल्याने तुम्हाला अशक्तपणा दूर झाल्याचे निदर्शनास येईल.

6) 1 चमचा मध आणि एक चमचा हळद पावडर मिसळून रोज सकाळी उपाशापोटी सेवन करा.

7) दोन ते तीन महिने पुनर्नवाच्या मुळांचा रस दूधासोबत नियमित दोन चमचे सेवन केल्याने वृद्धांनाही तारूण्याची जाणीव होते.

8) 100 ग्रॅम कौंच चे बीज आणि 100 ग्राम तालमखाना बारीक करुन त्याचे चुर्ण तयार करा. नंतर यामध्ये 200 ग्राम खडीसाखर बारीक करुन मिसळा. हे चुर्ण कोमट पाण्यात मिसळून सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.

9) रोज आवळ्याचा मुरब्बा, केळी खाल्ल्याने शक्ती वाढते. तसेच केळी खाल्ल्यानंतर दूध प्यावे.

Visit : Policenama.com