गुडघ्याच्या काळेपणामुळं शॉर्ट ड्रेस किंवा स्कर्ट घालता येत नाही ? आजच करा ‘हे’ 3 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेक मुलींना किंवा महिलांना गुडघ्यावरील काळेपणामुळं शॉर्ट ड्रेस किंवा स्कर्ट घालता येत नाही. गुघडे अनेक कारणांमुळं काळे पडतात. आपण याकडे जास्त लक्ष देत नाही हेही एक कारण आहे. जर वजन जास्त असेल तर त्वचा सैल पडते आणि यामुळंही गुडघे काळे पडतात. वजन कमी असेल तर गुघडे त्या तुलनेत जास्त काळे पडत नाहीत. यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) हळद, दूध आणि मध – 1 चमचा हळद, 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गुडघ्यांना लावा. 2 मिनिट मसाज करा. नंतर 15 ते 20 मिनिटांनी गुडघे कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्यास फरक दिसेल.

2) दूध आणि बेकिंग सोडा – 1 चमचा बेकिंग सोड्यात 1 चमचा दूध टाका आणि ही पेस्ट गुडघ्यांवर लावा. याचा वापर स्क्रबप्रमाणे करायचा आहे. काही मिनिटे मसाज केल्यानंतर गुडघे पाण्यानं स्वच्छ करा. दर 2 दिवसांनी हा उपाय केल्यास फरक दिसेल.

3) लिंबू – जर गुडघे काळे पडले असतील तर लिंबानं घासा. यातील व्हिटॅमिन सी चा खूप फायदा होतो. काही दिवस हा उपाय केल्यास फायदा होईल.