पांढरे केस काळे करण्यासाठी आहेत ‘हे’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – महिलांना अलीकडे प्रदूषण आणि विविध उत्पादनातून केल्या जात असलेल्या केमिकल्सच्या वापरामुळे केस गळण्यासापासून अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यामुळे आपण कमी वयातच वयस्कर दिसायला सुरुवात होते. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असतात. केस पिकल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित दिसत नाही मग आपण त्यासाठी महागडी उत्पादन वापरण्यास सुरुवात करतो. पण उत्पादनामुळे केमिकल्सचा संबंध केसांशी येतो आणि केस तेवढ्यापुरती काळी दिसायला लागतात. नंतर त्याच वेगाने केस पांढरे होण्यास सुरुवात होते.

तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या केसांना काळेभोर बनवू शकता. यासाठी कोणताही जास्त खर्च करावा लागणार नाही. तुमच्या घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरुन हे उपाय तुम्ही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

१. काळीमिरी
काळीमीरीचे केसांसाठी अनेक फायदे आहेत. यासाठी तुम्ही आधी काळ्या मिरीची बारीक पूड पाण्यात घालून उकळून घ्या. जेव्हा तुम्ही केस धुवत असाल. तेव्हा शॅम्पू लावल्यानंतर हे पाणी डोक्यावरुन घ्या. या उपायामुळे केस पांढरे होण्यापासून रोखता येईल. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

३. कढीपत्ता
स्वयंपाक घरात रोजच्या वापरात असलेल्या कढीपत्त्याचा वापर करुन तुम्ही केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता. त्यासाठी कढीपत्ता दोन ते तीन तासांसाठी भिजवत राहू द्या. मग या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. तसेच कढीपत्त्याचा रस काढून त्याला नारळाच्या तेलात एकत्र करुन लावल्यास फरक दिसून येईल. केसांना पोषण मिळण्यास मदत मिळेल.

४. आवळा
सौंदर्य प्रसाधन तसेच केसांच्या उत्पादनात आवळ्याचा वापर फार आधीपासून केला जात आहे. तुम्ही मेहेंदी लावते वेळी त्यात आवळ्याची पावडर घाला. तसेच आवळ्याची पेस्ट करुन केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. तुम्ही आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचा रस नारळाच्या तेलात मिक्स करुन लावला तर फरक दिसून येईल.

५. कांदा
तुम्ही जर कांद्याचा रस किंवा कांद्याची जाडसर पेस्ट करुन केसांच्या मुळांना लावलं तर समस्या नक्की दूर होईल. कांद्याची पेस्ट लावण्याकरिता जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. केसांवर कांद्याचा वापर करण्यापूर्वी केस स्वच्छ धुवून घ्या मग साल काढून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या आणि केसांना लावा. त्यामुळे केसांच्या मुळांना रक्ताभिसरण सुरळीत होते. केसांची वाढ होते. तसेच केस पांढरे होणे थांबतात.