दररोज रात्री लावा ‘होममेड’ नाईट क्रीम, हिर्‍यासारखा चमकत राहिल चेहरा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामातील थंड वारा त्वचेवर सर्वाधिक परिणाम करतो, ज्यामुळे त्वचा कोरडी व निर्जीव होते. तसेच कोरड्या आणि निर्जीव त्वचेवर मुरमांची समस्यादेखील अधिक दिसून येते. घरच्या घरी क्रीम बनवून वापरल्यास त्वचेतील ओलावा कायम राहील आणि ती कोरडे होणार नाही. तसेच चेहरादेखील चमकत राहील.

साहित्य

१) ताजे कोरफड जेल – १ चमचा

२) कोरफड जेल ट्यूब – १ चमचा (केशर चंदन असलेले)

३) ग्लिसरीन – ५ थेंब

४) बदाम तेल – ५ थेंब

बनविण्याची पद्धत

सर्व साहित्य चांगले मिसळा, कारण जेवढे चांगले एकजीव होईल तेवढी नाईट क्रीमदेखील चांगली तयार होईल. आता ते कंटेनर किंवा बाटलीमध्ये काढून घ्या. आणि त्यास स्वच्छ ठिकाणी ठेवा. आपण ते एका महिन्यासाठी आरामात वापरू शकता, कारण ते लवकर खराब होत नाही.

कसे वापरायचे

सर्व प्रथम चेहरा चांगले धुवा, जेणेकरून मेकअप, घाण आणि तेल काढून टाकले जाईल. आता ही क्रीम त्वचेत जाईपर्यंत मालिश करा. सुमारे ५-६ मिनिटे मालिश करून रात्रभर तसेच राहू द्या.

ही क्रीम का फायदेशीर आहे?

त्वचेला मॉइस्चराइज करते आणि नुकसान झालेल्या पेशींना पुनरुज्जीवित करते, ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. यामुळे त्वचेतील रक्त प्रवाहदेखील वाढतो, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.