JNU मध्ये ‘ते’ गुंड नेमके आले कसे ? का आतीलच विद्यार्थ्यांनी ‘चेहरा’ झाकून केला ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जवाहनलाल नेहरु विश्वविद्यालयातील (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात शिरुन हल्ला करण्याच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. असे असताना चेहरा झाकलेले हे गुंड जेएनयुमध्ये शिरलेच कसे आणि हल्ला केल्यानंतर ते परत गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. की, विद्यापीठ कॅम्पसमधील तरुणांनी चेहरा झाकून घेऊन हा हल्ला घडवून आणला आणि नंतर चेहऱ्यावरील नकाब काढून ते पुन्हा या विद्यार्थ्यांमध्ये सहभागी झाले. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटणार असून त्यात डावे व उजवे पक्ष एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करीत आहेत.

याची खरी सुरुवात गेल्या दोन दिवसांपासून सुरु झाली होती. फी वाढविल्यावरुन जेएनयुमधील विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरु केले होते. त्यांचे रजिस्टेशन बंद केले होते. तर, अभाविपकडून त्याला विरोध होत होता. रजिस्टेशन सुरु करावे, अशी अभाविपची मागणी होती. त्यावरुन विद्यापीठ आवारात या दोन गटात रविवारी दुपारी हाणामारी झाली होती. त्यावेळी काही शिक्षकही तेथे उपस्थित होते. त्यानंतर साधारण साडेसहा वाजेच्या दरम्यान चेहरा झाकलेले सुमारे ५० गुंड कॅम्पसमध्ये शिरले व त्यांनी परियार होस्टेल व साबरमती गर्ल्स होस्टेलवर हल्ला केला. तेथील विद्यार्थी, विद्यार्थ्थीनींना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षा आइशी घोष याही जखमी झाल्या. या हल्ल्यात शिक्षकही जखमी झाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला असून सहपोलीस आयुक्तांना याच्यामार्फत चौकशीचा आदेश दिला आहे. या सर्व घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जेएनयुमध्ये बाहेरुन कोणीही आत जाऊ शकत नाही. गेटवर बाहेरुन आलेल्यांना आपली ओळख सांगावी लागते. विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत सोडले जात नाही. कोणी बाहेरचे आले तर विद्यापीठातील त्यांच्याशी संबंधितांनी होकार कळविल्याशिवाय आत सोडले जात नाही. असे असताना इतके ५० जण आत शिरलेच कसे व घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर गेले कसे ? असा प्रश्न समोर आला आहे. जर हे गुंड बाहेरचे असतील तर मेन गेटपासून परियार होस्टेल आणि साबरमती गर्ल्स होस्टेल खूप आतमध्ये आहे. असे असताना बाहेरच्यांनी येऊन इतक्या आतमध्ये नेमक्या याच होस्टेलवर हल्ला करण्यामागे कारण काय असा प्रश्न समोर आला आहे.

दुसरी शक्यता व्यक्त केली जात आहे ती म्हणजे विद्यापीठातीलच विद्यार्थ्यांच्या गटाने हा हल्ला घडवून आणला. विद्यापीठातील या गटाने आपले चेहरे झाकून होस्टेलवर हल्ला केला. त्यानंतर चेहऱ्यावर घातलेला नकाब बाहेर जाऊन काढून टाकून पुन्हा या विद्यार्थ्यांमध्ये ते सहभागी झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या असून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/