Coronavirus : भाजपने गृहमंत्र्यांकडे मागितला राज्यातील ‘तबलिगीं’चा हिशेब (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत तबलिगी जमातीच्या मरकजच्या आयोजनाला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर प्रश्नांची फैरी झाडणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपनेच प्रतिप्रश्न केले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील तबलिगींचा हिशेब गृहमंत्री देशमुख यांच्याकडे मागितला आहे. राज्यातील किती तबलिकी गायब आहेत याचे उत्तर द्या असे सोमय्या यांनी म्हटले आहे. दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्या नागरिकांमुळे देशात आणि देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाला जबाबदार का धरलं जाऊ नये, असा सवाल त्यांनी केला. ज्यावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान रात्री दोन वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी जमातचे नेता मौलाना साद यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्यामध्ये अशी कोणती गुप्त चर्चा झाली, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. डोवल यांनी रात्री उशिरा साद यांची भेट घेण्यासाठी कुणी पाटवलं होत ? जमातच्या सदस्यांशी संपर्क करण्याचे काम एनएसएचा होता की दिल्ली पोलीस आयुक्तांचा ? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1248133150468788224

देशमुख यांच्या या पत्राला उत्तर म्हणून सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी तबलिगीच्या मुद्यावरून गृहमंत्र्यांना घेरलं आहे. महाराष्ट्रातून 1500 तबलीगी दिल्लीत गेले होते. मुख्यमंत्री म्हणतात ते सगळे सापडले. गृहमंत्री सांगतात दीड हजारमधील 50 तबलिगी गायब आहेत. आरोग्यमंत्री म्हणतात 100 फरार आहेत. आता गृहमंत्र्यांनीच नेमके किती तबलिगी गायब आहेत याचा हिशेब द्यावा, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तबलिगींमुळे महाराष्ट्राचं किती नुकसान झालं. त्यांना शोधण्यात एवढा उशीर का झाला असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.