लाभदायक ! ‘या’ 5 गोष्टींमुळं जीवघेण्या आजारांचा धोका कमी होण्यास होते मोठी मदत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अलीकडच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमीतता हे जीवघेण्या आजरांना निमंत्रण देत आहे. तसेच अलीकडच्या बदललेल्या जीवशैलीमुळे अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहे. अश्यात आपल्या आरोग्याचा बचाव करण्यासाठी आणि स्वतःला आजारमुक्त ठेवण्यासाठी काही घरगुती घटक उपयोगी ठरतात.

पावसाळ्यात डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरतात. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांभोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. पण आता डेंग्यू आणि कोरोना संसर्ग यामध्ये फरक दिसून येत नाही. मात्र, काही घरगुती उपाय केले तर ताप डेंग्यू सारख्या आजरांचा आपण सामना करु शकतो. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

१. पपई

पपई खाल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होते. आणि पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच शरीरातील पेशी वाढण्यासाठी पपईचे सेवन फायदेशीर ठरते. यामध्ये डाईट्री फायबर उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. पपई खाल्याने शरीराला व्हिटॅमिन C मिळते. ज्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजरांपासून वाचवते.

२. डाळिंब

ताप आल्यानंतर जर डाळिंबाचा रस दिला. तर शरीरातील उष्णता कमी होते. आणि ताप उतरतो. तसेच अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात अशावेळी डाळींब खाणं फायदेशीर ठरतं.

३, दुधी

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरासाठी गुणकारी ठरते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच दुधी ही हृद्याशी निगडीत समस्यांपासुन बचाव करते.

४. बीट

बीटाचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो. ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टि सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलीक असिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.

५. पाणी

सर्दी असल्यास कोमट पाणी पिणं हा चांगला उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही इन्फेक्शन यामुळे होत नाही. कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते. आणि शरीर आजारांपासुन मुक्त राहते.