तुमची कंपनी दर महिन्याला PF खात्यात पैसे जमा करते का ? ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   जेव्हा तुम्ही अशा एखाद्या कंपनीमध्ये काम करता, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) अंतर्गत नोंदणीकृत आहे, तेव्हा तुम्हाला तुमच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या वतीने ईपीएफओमध्ये जमा करावी लागते. यासाठी कंपनी दरमहा तुमच्या पगारामधून भविष्य निर्वाह निधी (EPF Money) रक्कम जमा करणे ही कंपनीची जबाबदारी आहे. मात्र अनेकवेळा असे दिसून आले आहे की, कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात करते मात्र ईपीएफओमध्ये जमा केले जात नाहीत.

EPF हा सरकारी किंवा बिगर सरकारी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकीचा एक प्रकार आहे. जो कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरतो. नियमांनुसार, ज्या कंपनीत किंवा संस्थेत 20 किंवा अधिक कर्मचारी आहेत, त्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्याची व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी, ईपीएफओने अनेक सेवा सुरु केल्या आहेत. आपण फोनवरून, एसएमएसद्वारे किंवा वेबसाइटवर जाऊन आपल्या पीएफ खात्याची माहिती घेऊ शकता.

फोनवरही मिळेल पीएफची माहिती

फोनवरुनही ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 011-229-01-406 नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. मात्र एक लक्षात ठेवा आपण ज्या नंबर वरुन कॉल करत आहात तो फोन नंबर ईपीएफओसह नोंदणीकृत असावा. या सुविधेसाठी आपला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) ईपीएफ पोर्टमध्ये सक्रिय असावा.

एसएमएस (SMS) वरुन माहिती मिळवा

तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळवण्यासाठी एसएमएस वरुनही मिळवू शकता. एसएमएस सेवेसाठी यूएएन पोर्टलमध्ये, सक्रिय सदस्यांना त्यांचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ‘EPFOHo UAN’ असा एसएमएस लिहून तो 7738299899 क्रमांकावर पाठवावा लागेल. विशेष म्हणजे ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

10 भाषांमध्ये मिळते माहिती

नोंदणीकृत दहा भाषांपैकी कोणत्याही एकामध्ये माहिती मिळवायची असल्या त्यासाठी तुम्हाला त्या भाषेची पहिली तीन अक्षरे एसएमएसमध्ये टाइप करावी लागतील. उदा. आपल्याला नोंदणीकृत फोन नंबर वरुन पंजाबी मध्ये पीएफ खात्याची माहिती मिळवायची असेल तर ‘EPFOHO UAN PUN’ टाइप करुन 7738299899 वर पाठवावा लागेल.

अ‍ॅपद्वारे माहिती मिळवा

मिस कॉल आणि एसएमएस व्यतिरिक्त आपण उमंग (UMANG) अ‍ॅपद्वारे पीएफ खात्याची माहिती मिळवू शकता. फोन केल्यावरही तुम्हाला तुमच्या पीएफ हप्ता, पीएफ खात्यातील शिल्लक आणि केवायसीची माहिती मिळेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like