‘या’ पद्धतीनं घरीच तपासून पहा, तुमचं सॅनिटायझर ‘असली’ की ‘नकली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  काही ठिकाणी नकली सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या तापासणी दरम्यान नुकत्याच समोर आल्या आहेत. या कंपन्या ब्रँडेड कंपन्यांसारखेच सॅनिटायझर बनवत होत्या. लोकांना ओळखणं अवघड झालं होतं की कोणतं सॅनिटायझर असली आणि कोणतं नकली.

रकारने सूचना दिल्या आहेत की, 70 ते 80% अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर लोकांनी वापरावं. पण आपल्याला कसं समजणार की हेच सॅनिटायझर खरं आहे. या तर जाणून घ्या कसं ओळखायचं सॅनिटायझर खरं आहे की खोटं.

तुमच्या घरात गव्हाचं पीठ तर असेलच. तुम्ही पिठाचा वापर करून हे तपासू शकता. तुमचं सॅनिटायझर एका वाटीत पीठ घेऊन त्यावर चमच्याने टाका, नंतर त्याला मिसळण्याचा प्रयत्न करा. जर पीठ त्यामध्ये मिसळलं गेलं तर ते सॅनिटायझर नकली आहे असं समजा. आणि जर सॅनिटायझर खरं असेल तर पीठ सॅनिटायझरमध्ये मिसळणार नाही.

आजकाल सर्वांच्या घरात टॉयलेट पेपर किंवा टिशू पेपर असतोच. तुम्ही एक टिशू पेपर घेऊन त्यावर पेनने एक गोल काढा, त्यानंतर त्यावर एक थेंब सॅनिटायझर टाका.

जर शाईने बनवलेला गोल विस्कटला तर समजून घ्या की तो सॅनिटायझर नकली आहे. जर तो गोल तसाच राहिला तर सॅनिटायझर खरा आहे असं समजावे.

अजून एका प्रकारे तुम्ही ओळखू शकता. एका वाटीत सॅनिटायझर घ्या त्यावर हेअर ड्रायरने हवा मारा, जर 5 ते 7 सेकंदात ते सुकलं तर ते सॅनिटायझर खरं आहे असं समजावं.