आकाशातून पडला ‘मौल्यवान’ दगडांचा पाऊस, ‘या’ गावातील लोक बनले ‘लखपती’

ब्राझील : वृत्तसंस्था –   आकाशातून दगड म्हणजे उल्का नेहमी पृथ्वीवर पडत असतात. पण यावर लक्ष देण्यासारखं यामध्ये काही विशेष नाही. अशा प्रकारे पडलेल्या उल्का, दगड वैज्ञानिक अभ्यासासाठी घेऊन जातात किंवा लोक त्याला एलियन कडून मिळालेलं गिफ्ट समजून संग्रही ठेवतात. ब्राझील मध्ये उल्कापातामुळे हजारो दगडांचे तुकडे पडले आहेत. यातील सर्वात मोठ्या दगडाच्या तुकड्याची किंमत 19 लाखापेक्षा अधिक आहे.

ब्राझील मधील सैंटा फिलोमेना या गावात 19 ऑगस्टला उल्काच्या दगडांचा अक्षरशः पाऊस पडला. तिथले स्थानिक लोक याला पैशांचा पाऊस म्हणत आहेत. कारण लोकांनी हे दगड जमा करून ठेवले, आता वैज्ञानिकांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा समजलं की हे दगड अत्यंत दुर्मिळ आहेत. वैज्ञानिकांनी जेव्हा लोकांना हे दगड मागितले तेव्हा लोक त्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत आहेत. अनेक लोकांनी यातून लाखो रुपये कमावले आहेत.

40 किलोग्रॅम वजनाच्या सर्वात मोठ्या तुकड्याची किंमत 26 हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे जवळजवळ 19 लाख रुपये. सांगितलं जातं आहे की या गावात छोटे मोठे असे एकूण 200 दगड पडले आहेत. हे तुकडे त्या उल्कापिंडाचे आहेत जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली. या तुकड्यांचा अभ्यास करून अनेक रहस्य जाणून घेण्यास मदत होणार आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की असे फक्त 1% उल्कापिंड असतात जे लाखो रुपये किंमतीला विकले जातात. ब्राझीलच्या या गावातील लोक खूप गरीब आहेत. ज्यांना हे दगड मिळाले ते रातोरात श्रीमंत झाले आहेत. एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की त्या दिवशी आकाशात सगळीकडे धूर पसरला होता. मग मला एक मेसेज आला की आकाशातून ज्वलंत दगड पडत आहेत.

असं म्हटलं जात आहे की हा उल्कापिंड जवळजवळ 4.6 बिलियन वर्षे जुना आणि अत्यंत दुर्मिळ आहे. यांची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. साओ पाओलो विद्यापीठातील केमिस्ट्री इन्स्टिट्युटचे गेब्रियल सिल्वा यांनी सांगितलं की ही उल्का त्या पहिल्या खनिजाची आहे ज्यापासून आपलं सोलर सिस्टम बनलं.

स्थानिक लोकांना त्यांच्या भागात पडलेले हे दगड खूप किंमती आहेत हे समजल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की आकाशातून पैशांचाच पाऊस पडला आहे. एडीमार कोस्टाला एक सात सेंटिमिटरचा दगड मिळाला, त्याचं वजन 164 ग्रॅम होतं, त्याने हा दगड 97 हजार रुपयांना विकला.

लोक अशी चर्चा करत होते की देवानेच त्यांच्यासाठी पैशांचा पाऊस पाडला आहे. एका व्यक्तीने 2.8 किलोचा दगड विकून तब्बल 14.63 लाख रुपये मिळवले. रोडरिक्सने सांगितले की, या गावातील 90% लोक शेती व्यवसाय करतात. या गावात जास्त दुकानं नाहीत, लोकांचं आयुष्य सुधारण्यासाठी हा दगडांचा पाऊस पडला आहे.