नोकरी गेल्यानंतर त्यांनी चक्क पत्नीच्या शरीराचाच केला ‘सौदा’, मित्रांकडून करायला लावला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीची नोकरी सुटली म्हणून त्याने आपल्या बायकोलाच देह विक्री करायला लावली. पैशांच्या हव्यासापायी ही व्यक्ती आपल्या मित्रांना घरी बोलावून बायकोचा बलात्कार करत असे. आपल्या दोन लहान मुलींसह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत महिलेने आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील हा खळबळजनक प्रकार आहे.

महिलेने आपल्याला पतीने देहविक्री करायला लावली असल्याचे सांगत अनेकदा बलात्कार देखील केल्याचे म्हंटले आहे आणि याबाबत पतीवर कारवाई करण्याची मागणी देखील पोलिसांकडे केली आहे. पीडित महिलेने सांगितले की कानपूरच्या पवन कुमार यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या होत्या. मात्र या मुली माझ्या नसल्याचे म्हणत अनेकदा महिलेला तिच्या पतीने मारहाण देखील केलेली आहे.

पीडितेने सांगितले की पतीने काम सोडून दिल्यानंतर अनेकदा तिच्याकडे पैशाची मागणी केली आणि पैसे न मिळाल्याने मित्रांना बोलावून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या मुलीने सांगितले की तिचे वडील आईला शिव्या देत असत आणि जोर जोरात मारहाण देखील करत.

पोलीस अधीक्षक हेमराज मीणा यांनी महिलेच्या तक्रारीवरून तत्काळ तक्रार देखल केली आहे आणि यावर लवकरच कठोर कारवाई करू असे आश्वासन देखील यावेळी हेमराज मीना यांनी दिले आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like