मी शरद पवारांसोबतच, पुणे जिल्ह्यातील ‘या’ आमदारानं सांगितलं

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्यात गेल्या एक महिन्यापासून ज्या काही घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडी बाबतीत कोणी काहीही म्हणो मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे,  अशी रोख ठोक प्रतिक्रिया शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.

आमदार अशोक पवार हे कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थान येथील जयपूर या ठिकाणी गेले होते. जयपूर येथून ते आज सकाळी पुण्यात परत आले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर त्यांना पक्षश्रेष्ठींचा फोन आल्याने ते मुंबईला निघाले.

देशाचे व महाराष्ट्राचे आदरणीय नेते शरद पवार साहेब यांच्याच सोबतच एक निष्ठेने ,सदैव रोखठोकपणे राहणार आहे.असे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पोलीस नामाशी बोलताना सांगितले.

Visit : Policenama.com