‘मै नही मानती’ कवितेद्वारे ममता दीदीने साधला भाजपवर ‘निशाणा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक गोंधळून गेले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला चांगलाच फटका बसला आहे. भाजपने बंगालमध्ये चांगले प्रदर्शन करताना लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या आहेत. गेल्यावेळेस येथे भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला १२ जागांचा फटका बसला आहे. निकालाच्या आधी ममता बॅनर्जी या सिंथेसायजर वाजवताना दिसून आल्या. आता ममता बॅनर्जी यांनी कविता केली आहे. कवितेतून त्यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला आहे.

‘मै नही मानती’ हे ममता यांच्या कवितेचं शीर्षक आहे. ममता बॅनर्जी यांनी ही कविता त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केली आहे. त्यांनी बांगला, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही कविता शेअर केली आहे. या कवितेतून ममता यांनी भाजपने धर्माचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप केला आहे. कवितेच्या शेवटी वसुधैव कुटुम्बकम असा संदेश देत सहिष्णुतेचा आग्रह केला आहे. ममता यांनी स्वतःला सहिष्णू सेविका आणि मानवता धर्माला मानणारी म्हंटले आहे.

बंगालमध्ये २ वर्षानंतर २०२१ ला विधानसभेच्या निवडणूक आहेत. या निवडणुकीत भाजपला मिळालेला यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे. मतमोजणीच्या दरम्यान ममता यांनी ट्विट करून म्हंटले होते की, विजेत्यांचे अभिनंदन पण सर्व पराभव झालेले पराभूत नाहीत.