जगेन असं वाटलं नव्हतं पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला आज विश्वास बसत नाही. कारण मी जगेन असं मला वाटल नव्हतं, पण नियतीचा खेळ आहे. मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो.

गुरुवारी शिवतीर्थावर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी दोन आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळ म्हणाले, माझ्यासोबत जे काही झालं ते मी कधीच विसरलो आहे. पण मी कोणासोबतही सुडबुद्धीचं राजकारण करणार नाही. माझ्यासोबत कोणी आकसाने वागलं म्हणून मी कोणाशी तसा वागणार नाही, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.

भाजपवर निशाणा साधताना छगन भुजबळ म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते मला विरोधी पक्षासाठी मत द्या. तर देवेंद्र फडणवीस बोलायचे विरोधी पक्ष संपला आहे. आता आम्हाला विरोधक मिळाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही जिथे चूकणार तिकडे तुम्ही सांगायचं. मात्र विरोधाला विरोध चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी या मुलाखती दरम्यान मांडली.

Visit : Policenama.com