माझ्या महाराष्ट्राला कोणी भिकारी म्हटलेले मला चालणार नाही : सुप्रिया सुळे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्य जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा समाचार सुप्रिया सुळेंनी वाशी-भूम -परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत घेतला आहे. माझ्या महाराष्ट्राला भिकारी कोणी म्हटलेले मला चालणार नाही. महाराष्ट्राला वाकडं नजरेनं जरी पाहिलं तर गाठ सुप्रिया सुळेंशी आहे. असा ईशारा सुप्रिया सुळेंनी सावंत यांना दिला.

तानाजी सावंत यांच्यवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की , ‘मी दिल्लीत काम करते, मी विरोधकांवर जास्त बोलत नाही. महाराष्ट्रात सगळं दादा बघतात कधीतरी कुणी नारळ फोडायला बोलवतं, ते भाग्यच माझं. मला माहितही नव्हत भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून राहुल मोटेंविरुद्ध कोण उभा आहे. मला, इथं आल्यावरच समजलं. महाराष्ट्रातील हेच मंत्री ,म्हणाले होते खेकड्यांमुळे धरण फुटले. मला तेव्हा दिल्लीतून काहींचे फोन आले, तुमच्या महाराष्ट्रात खेकड्यानं धरण फोडलं असं मत्रीमहोदय सांगत असल्याची विचारणा झाली. तेव्हा ते हसायला लागले, मी दम देऊन माझ्या महाराष्ट्राला हसायचं नाही, असं बजावलं.’

जलयुक्त शिवारमध्ये फक्त पुरंदर तालुक्यात 200 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे खुद्द तानाजी सावंत यांनी मान्य केले आहे. आता कोणी कोणाचे ऐकून मतदान करत नाही. ज्या उमेदवाराचे कर्तृत्व आहे, त्यांनाच मतदान करा. महाराष्ट्राला भिकारी म्हणाऱ्याला तुम्ही मतदारसंघातून हद्दपार करा असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

 

Visit : Policenama.com