आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, निलेश राणेंची इच्छा

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसमधून भाजपत आलेल्या राणेंनी आज आपला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन केला असताना भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेबाबात राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. येत्या काळात भाजपला कोकणात एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे रोखठोक मत व्यक्त करुन शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच आदित्य ठाकरे हे निवडून येऊ नयेत, असे मला वाटते असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले रोखठोक मत व्यक्त केले. आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता आगोदर आदित्यला निवडून तरी येऊ द्या, आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत असे मला वाटते, असे निलेश राणे यांनी सांगितले.

कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर आव्हान असल्याचे वाटत नाही असे सांगताना ते 50 ते 60 हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने आमचा पक्षप्रवेश लांबवला असे आम्हाला वाटत नाही. नारायण राणे हे भाजपकडूनच खासदार झाले आहे. तसे नितेश राणे यांनाही भाजपानेच उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच एक नंबरचा पक्ष राहिल असा विश्वास व्यक्त करताना युतीला 200 जागा मिळतील असेही त्यांनी सांगितले. सध्या कोकणात भाजपाचा विस्तार करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. मात्र, पक्षाला राज्यात जिथे जिथे गरज पडेल, तिथे आम्ही पक्षाला मदत करु असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी