दुर्देवी ! मुलं अधिकारी अन् आई रस्त्यावर, IAS अधिकार्‍यानं शेअर केला ‘तो’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सोशल मीडियामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. याच सोशल मीडियामुळे अनेकांचे सत्य आणि वास्तव बाहेर आले आहे. याच सोशल मीडियामुळे नवनवीन माहिती, भावूक बाबी आदी गोष्टी वेगाने पसरतात. यातच एका आयएएस अधिकार्‍याने एक भावूक फोटो शेअर केला आहे. त्याचं कॅप्शन अर्थात फोटो ओळी ‘मुलं अधिकारी पदावर अन् माय रस्त्यावर’ असं लिहलं होतं. त्यामुळे तो फोटो अनेकांपर्यंत पोहचला, व्हायरल झाला. मात्र, त्यातील फोटोतील महिलेचे नाव अद्याप समोर आले नाही.

हल्ली ‘गरज सरो, वैद्य मरो’, अशा पध्दतीने बरेचजण वागत असल्याचे आढळत आहे. त्यामुळेच वृध्दांश्रम निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी मुलं नोकरीला लागली की आई-वडिलांना विसरतात किंवा त्यांची अडचण होते. अशावेळी त्यांना घराबाहेर काढले जातं. बर्‍याचदा एकूण परिस्थिती पाहून आई-वडील हेच घरही सोडतात. कोरोना विषाणूच्या काळात मात्र अनेक ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडताना पाहायला मिळाले. एकमेकांना मदत करणारे आणि माणुसकी जपणार्‍या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी 21 ऑगस्ट रोजी एका सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय. यात या फोटोवरचं कॅप्शन अर्थात फोटो ओळी वाचून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. या आईचा एक मुलगा अधिकारी तर दुसरा मुलगा नेता, नात अधिकारी आणि तरीही या माऊलीला छप्पर नाही. सोशल मीडियावर या माऊलीचा फोटो खूप प्रमाणात व्हायरल होतोय, असं कॅप्शन अधिकारी अवनाश शरण यांनी दिलंय.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही युझर्सनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी त्यांना मदतीचा हात पुढे करून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला तर एका युझरनं या महिलेची मुलं दूर राहात असल्यानं त्यांनी देखरेखीसाठी एक केअर टेकर ठेवली होती. मात्र, तिने नीट काळजी घेतली नाही, त्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलीय.

हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. या महिलेची नीट काळजी न घेतल्याने तिची प्रकृती खालवली. त्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे, असा दावा अनेक युझर्सनी केलाय.