Coronavirus : ‘… तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याची ऑर्डर देऊ’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा वाढता प्रादुर्भामुळे बहुतांश राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही काही लोक रस्त्यावर भटकंती करीत आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.

कोरानामुळे अमेरिकेत लॉकडाऊनसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. जर लोकांनी लॉकडाऊन पाळला नाही आणि गरज भासली तर राज्यात संचारबंदी लावण्यात येईल. आदेश न पाळणार्‍यांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील, असा कठोर इशारा चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. अशी परिस्थिती येऊ देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.नागरिकांनी कुठेही बाहेर जाऊ नये. काही अडचण असल्यास 100 हा क्रमांक डायल करावा. पोलीस संबंधितांच्या घरी मदतीसाठी येतील. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. ज्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, परंतु ते झाले नाहीत, त्यांचे पासपोर्ट जप्त करा. ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांच्यावर सरकार नजर ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.