पाकिस्तानच्या उलट्या ‘बोंबा’ ! भारतीय लष्कराच्या कारवाईत ‘निष्पाप’ नागरिक मारले गेले : PM इम्रान खान

वृत्‍तसंस्था : लाईन ऑफ कंट्रोलवर (एलओसी) पाकिस्तानकडून होत असलेली घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या बॅटच्या (बॉर्डर एक्शन टीम) 7 सैनिकांना ठार केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली. पंतप्रधान इम्रान खान यांनी तडकाफडकी इस्लामाबाद येथे राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) बैठक बोलावली. बैठक झाल्यानंतर इम्रान यांनी यांनी ट्विट करून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत निष्पाप नागरिक मारले गेल्याचे म्हंटल आहे.

केंद्र सरकारने अतिरिक्‍त 28 हजार सैनिक जम्मू-काश्मीरच्या खोर्‍यात पाठविले आहेत. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर दहशतवादी हल्‍ला होण्याची शक्यता असल्याने यात्रा स्थगित करण्यात आली. एवढेच नव्हे तर यात्रेकरूंना तात्काळ जम्मू-काश्मीरमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले. परेदशी नागरिाकांना देखील जम्मू-काश्मीर मधून निघून जाण्यास सांगितलं. दरम्यान, एलओसीवर भारतीय लष्कराने घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानच्या 7 सैनिकांना ठार मारलं. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी हे ट्विट केलं आहे.

काश्मीरमध्ये सध्या मोठ्या घडामोडी होत असताना पहावयास मिळत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचसंदर्भात दिल्‍लीमध्ये महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीस सुरक्षा सल्‍लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते. घुसखोरी करणार्‍यांना ठार मारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान हे निष्पान लोकांचा बळी गेला असं म्हणत असतील तर त्याला चोराच्या उलटया बोंबाच म्हणावं लागेल.

आरोग्यविषयक वृत्त –