लाच प्रकरणी ‘या’ अधिकाऱ्यास 4 वर्ष कैद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीची हद्द कायम मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठवण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी परीक्षण भूमापक दौलत डामरे यास चार वर्षे साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, दाैलत डामरे ह आक्टोबर २०१० मध्ये अकाेले येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत होते. या वेळी एका व्यक्तीकडून जमिनीची हद्द कायम मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी त्यांनी सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. २९ ऑक्टोबर २०१० रोजी लाचेची रक्कम स्वीकारताना डामरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन पोलिस उपअधीक्षक विजय धोपावकर यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून संगमनेर येथील विशेष न्यायालयात ११ मार्च २०११ला दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने चार वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. डामरे यांना २४ हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज सहायक सरकारी वकील कोल्हे यांनी काम पाहिले.

Visit : Policenama.com