मुरबाडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी 15 ऑगस्ट साजरा केला आदिवासी विद्यार्थ्यांसोबत

मुरबाड : प्रतिनिधी (अरुण ठाकरे) –   कोरोना मध्ये आर्थिक संकट कोसळले असताना शासनाने ऑनलाइन शिक्षण चालू केले असता आदिवासी वस्ती मध्ये अँड्रॉइड मोबाईल,ल्यापटॉप,कंप्युटर ची सुविधा नसल्याने शिक्षणा पासून वांचिंत राहण्याची वेळ अली आहे या कडे लक्ष देत १५ आ़ँगस्ट निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष देवेंद्र जाधव, ऋषिकेश तेलवणे,विकास गुप्ता, स्नेहल देसले व सहऱ्यानी इंदिरा वाडी, नांदगाव वाडी, वाघाची वाडी या आदिवासी वाड्या पाड्यात जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्य,खाऊ वाटप करून १५ ऑगस्ट साजरा केला.

देशा वर कॉरोनाचा सावट असल्या मुळे शाळा बंद असल्याने मुरबाड मनसेने एक वेगळे पाऊल उचलत चालू वर्षी दहीहंडी साजरी न करता होणार खर्च आदिवासी विद्यार्थ्यांन च्या शिक्षणासाठी लावायचा संकल्प करत १५ ऑगस्ट चे अवचित्त साधत वड्या पाड्यात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्या कारणाने त्यांना शालेय स्टेशनरी देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत १५ ऑगस्ट साजरा केला.