टिप्परच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून दूध आणण्यासाठी गेलेल्या दोन तरूण बहिणींचा टिप्परच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांचा संताप पाहून टिप्पर चालक वाहन सोडून पळून गेला.

लक्ष्मी रमाशंकर शाहू (वय- २१) व आँचल रमाशंकर शाहू (वय – १९ रा. प्लॉट नं. १९६ जयदुर्गा शंकर किराणाजवळ बीडगाव) अशी मृत बहिणींची नावे आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दोन्ही बहिणी आपल्या अ‍ॅक्टिव्हा (एमएच ४९ एझेड ९३३१) या दुचाकीवरून दूध आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परची (एमएच ४० के. १००८) धडक त्यांच्या दुचाकीला बसली. टिप्परच्या धडकेमुळे दोघी खाली पडल्या.

त्यांच्या अंगावरून टिप्परचे चाक गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बहिणींचे मृतदेह चेंदामेंदा झाले होते. लोकांचा संताप पाहता चालक टिप्पर सोडून पळाला. नागरिकांनी कळमना पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like