पुण्यात युती 5 जागांवर तर आघाडी 3 जागांवर पुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातून एक मोठी बातमी समोर येतीय. पुण्यात पाच मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवर आहे तर तीन जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे.

तिसऱ्या फेरीनंतर वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर आहेत तर खडकवासला मतदार संघात देखील राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहेत. सुनील टिंगरेसमोर भाजपच्या जगदीश मुळीक यांच आव्हान आहे तर दोडके यांच्याविरोधात भाजपचे भीमराव तापकीर पिछाडीवर आहेत. तर शिवाजी नगरमधून आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट हे आघाडीचे उमेदवार पुढे आहेत.

तर पुणे शहरातून भाजपचे पाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहे. यात कोथरूड मतदारसंघ, कंटोलमेंट आणि कसबा मतदारसंघ आहे. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, कसब्यातून मुक्ता टिळक तर कॅंटॉलमेंटमधून सुनील कांबळे आघाडीवर आहेत. तर पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ आघाडीवर आहेत. हडपसर मतदार संघात देखील भाजपचे योगेश टिळेकर मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

अद्याप पूर्ण फेऱ्या झालेल्या नाहीत मात्र सध्या पुण्यामध्ये भाजप पाच तर तीन जागांवर आघाडी पुढे आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com