सांगलीत ‘स्वाईन’ने महिलेचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगलीत स्वाईन फ्लूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मदिना दाऊद पखाली (वय 40, रा. नळभाग, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचावर वसंतदादा शासकीय रूग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरू होते. या महिलेच्या मृत्यूनंतर स्वाईन फ्लुमुळे बळी गेलेल्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. पखाली यांच्या मृत्यूनंतर स्वाईन फ्लूमुळे महापालिका क्षेत्रातील पहिलाच बळी गेला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’692fb135-cab3-11e8-abaa-99273c0dcf8c’]

पखाली पती, एक मुलगी, दोन मुले यांच्यासमवेत खणभागात रहात होत्या. पाच दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्याने खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतरही ताप कमी न झाल्याने त्यांच्या थ्रोट स्वॅपचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना स्वाईनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सिव्हील मधील  विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. तेथे रविवारी सकाळी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

निवृत्त न्यायाधीशांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

स्वाईन फ्लूने गेल्या महिना-सव्वा महिन्यात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 15 रुग्ण ग्रामीण भागातील, 1 रुग्ण नागरी भागातील व 1 रुग्ण राज्याबाहेरील आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे एकूण 86 रूग्ण आढळले होते. त्यातील 55 जणांना लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. तर 29 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. तर दोन रूग्णांचा अहवाल अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. आता पर्यंत स्वाईन फ्लूमुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता. पखाली यांच्या निधनामुळे हा आकडा 18 वर गेला आहे.

[amazon_link asins=’B07DJHV6S7,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0820ef09-cab4-11e8-87c7-6348c0634a76′]