मोदींच्या सभेत ‘हे’ होण्याचा पोलिसांना धसका, पोलिसांकडून कंगवे, चुनाडब्या, पेनही जप्त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील आयोजित सभेत संतप्त शेतकऱ्यांकडून कांदाफेकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सभेला येणाऱ्यांची कसून झडती घेतली जात आहे. सभेला येणाऱ्यांच्या खिशातून चक्क कंगवा, चुना डबी, पेन, अशा वस्तू प्रवेशद्वारावरच काढून घेतल्या जात आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे . उद्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगावमधील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपळगाव बसवंत कांदा उत्पादनामध्ये अव्वल असल्याने संतप्त शेतकऱ्यांकडून कांदाफेकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेने कांदा उत्पादकांच्या रोषाचा धसका घेतला आहे. दरम्यान, सभेला येणाऱ्या नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशवीतून आणलेले खाद्यपदार्थ यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच सभेला आलेल्यांच्या खिशातील पाकिटांचीही चौकशी करण्यात येत आहे. याचबरोबर, खिशात असलेले कंगवा, चुना डबी, पेन, अशा वस्तू देखील प्रवेशद्वारावरच काढून घेण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like