प्राप्तिकर विभागाचा पुण्यातील व्यवसायिकाच्या कार्यालयात छापा, लाखोंची रोकड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजभवनापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत आणि पुणे महापालिकेपासून संसद भवनापर्यंत सर्व ठिकाणी आवश्यक सेवा-सुविधा पुरविणाऱ्या कंपनीच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने एकाच वेळी छापे घातले. प्राप्तिकर विभागाने कंपनीच्या पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, बेंगलूरू आणि नोएडा या शहरातील कार्यालयावर एकाचवेळी छापा टाकला. कारवाई दरम्यान पुण्यातील कार्यालयात 60 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. कंपनीने 91 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दाखवले होते. या संदर्भात कोणतीही कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली नाहीत. कंपनीने खरेदी केलेल्या बिलामध्ये खोटी खर्चाची बिले सापडली आहे. याची रक्कम 77 कोटी रुपये असून प्राप्तिकर विभागाकडून पुढील तपास सुरु आहे.

पुण्यातील कार्यालयात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फक्त 20 कोटी रुपयांच्या रोख खर्चाच्या संदर्भातील पुरावे हाती लागले आहेत. तर 60 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. अधिकाऱ्यांना सापडलेल्या कागदपत्राच्या आधारे 2016-17 पासून 180 कोटी रुपयांची घोषीत न केलेल्या संपत्तीची कागदपत्र सापडली असून पुढील तपास सुरु असल्याचे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके