MS धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारताच हिटमॅन रोहितनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेला 3-0 असा व्हाईटवॉश दिल्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका आणि डे- नाईट कसोटी सामना खेळणार आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणारा हा भारतातील पहिला डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. याआधी भारतीय संघातील वृद्धिमान सहा आणि मोहम्मद शमी यांना डे- नाईट कसोटी सामना खेळण्याचा अनुभव आहे. सुपर लीगमध्ये दोघेही डे- नाईट सामना खेळलेले आहेत.

त्याचबरोबर भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा हा देखील गुलाबी चेंडूने खेळला आहे. त्यामुळे मी हा सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये गुलाबी चेंडूने खेळल्यामुळे मला त्याचा चांगला अनुभव असल्याचे त्याने म्हटले आहे. या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याविषयी बोलताना रोहित म्हणाला कि, अधिक सामने जिंकून चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच मी किती काळ कर्णधार आहे याचा विचार करत नाही तर चांगली कामगिरी करण्याकडे माझा कल असल्याचे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, धोनीच्या निवृत्तीवर त्याला प्रश्न विचारण्यात आला असता, त्याने मला याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले. तसेच मी याबद्दल तुमच्याकडूनच पहिल्यांदा ऐकत आहे. मी याआधी काहीही ऐकले नसल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

 

Visit : Policenama.com