IND vs NZ : भारत यावेळी क्रिकेटमध्ये रचणार ‘इतिहास’, फक्त 1 ‘विजय’ दूर

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड सोबतच्या टी 20 मालिकेत भारताने 2 – 0 ने आघाडी घेतली आहे. 29 जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये जर भारताने विजय मिळवला तर मोठा इतिहास घडेल.

दोनीही टीममध्ये याआधी 2008 मध्ये टी 20 सामना खेळण्यात आला होता. ज्यामध्ये न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला होता. दहा वर्षानंतर 2018 मध्ये झालेल्या मालिकेत देखील न्यूझीलंडने त्यांच्या देशात झालेल्या मालिकेमध्ये 2-1 असा विजय मिळवला होता. भारताने अजून त्यांच्याच देशात जाऊन त्यांना हरवलेले नाही त्यामुळे यावेळी तशी संधी उपलब्ध आहे.

न्यूझीलंडमधील भारताचे टी 20 मालिकांचे रेकॉर्ड
2008-2009 – न्यूझीलंड 2-0 ने विजयी
2018-2019 – न्यूझीलंड 2-1 ने विजयी
2019-2020 – भारत 2-0 ने लीडमध्ये (5 सामन्यांची मालिका)

न्यूझीलंडच्या भूमीवर आतापर्यंत भारताने एकूण 7 सामने खेळले आहेत. यातून टीम इंडिया 3 वेळा विजय मिळवू शकली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 14 टी -20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी न्यूझीलंडने 8 वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी भारताने 5 सामने जिंकले आहेत, तर 1 सामना रद्द झाला आहे.

न्यूझीलंडमध्ये भारताची कामगिरी (टी-20)
25 फेब्रुवारी 2009 (क्राइस्चर्च) न्यूझीलंडचा 7 विकेटने विजय
27 फेब्रुवारी 2009 (वेलिंगटन) न्यूझीलंडचा 5 विकेटने विजय
6 फेब्रुवारी 2019 (वेलिंगटन) न्यूझीलंडचा 80 धावांनी विजय
8 फेब्रुवारी 2019 (ऑकलैंड) भारतचा 7 विकेटने विजय
10 फेब्रुवारी 2019 (हेमिल्टन) न्यूझीलंडचा 4 धावांची विजय
24 जानेवारी 2020 (ऑकलैंड) भारत 6 विकेटने जिंकला
26 जानेवारी 2020 (ऑकलैंड) भारत 7 विकेटने जिंकला

मालिकेत आतापर्यंत
ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर रविवारी झालेल्या टी -२० सामन्यात भारताने न्यूझीलंडला 7 गडी राखून पराभूत केले यावेळी भारताच्या लोकेश राहुलने चांगली कामगिरी करत नाबाद अर्धशतक केले. भारताने पहिल्यांदाच सलग दोनवेळा न्यूझीलंड विरोधात सामने जिंकले आहेत. त्यामुळे जर भारताने ही मालिका जिंकला तर तो एक नक्कीच इतिहास ठरेल.

फेसबुक पेज लाईक करा