Coronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यात कोरोना महामारी कमी होण्याचे नाव घेत नाही. तर रूग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढला आहे. तालुक्यातील नागरीकांची चिंता वाढताना दिसुन येत आहे. परिणामी रूग्ण संख्या वाढत असुन गुरूवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यात 135 संशयीतांची तपासणी वेगवेगळ्या ठीकाणी करण्यात आली असुन त्यामध्ये 39 रूग्णं पाॅझीटीव्ह आढळुन आले आहेत. तर इंदापूर शहरात आज 12 रूग्ण पाॅझीटीव्ह आल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाजन व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहास शेळके यांनी दीली.

इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड आटिंजन टेस्ट अंतर्गत 20 रूग्ण पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील कसबा येथील 41 वर्षीय पुरूष, 68 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, 10 वर्षीय चिमुकला, तर सरस्वतीनगर येथील 17 वर्षीय मुलगी, इंदापूर शिक्षक सोसायटी येथील 14 वर्षीय मुलगी, 46 वर्षीय महिला, इंदापूर श्रीराम सोसायटी 38 वर्षीय पुरूष, इंदापूर श्रीदत्त सोसायटी येथील 30 वर्षीय महिला, इंदापूर सोनाईनगर येथील 42 वर्षीय पुरूष,इंदापूर बाबा चौक येथील 32 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर पळसदेव येथील 30 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष,वरकुटे बु. येथील 52 वर्षीय पुरूष, लाखेवाडी येथील 68 वर्षीय पुरूष, पळसदेव येथील 65 वर्षीय पुरूष, जंक्शंन येथील 65 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 23 वर्षीय पुरूष, गोतोंडी येथील 45 वर्षीय पुरूष,काळेवाडी येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बारामती येथील खासगी लॅबमध्ये 8 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये अंथुर्णे येथील 36 वर्षीय पुरूष, न्हावु शिंदे वस्ती येथील 41 वर्षीय पुरूष, निमगावकेतकी डाक बंगला येथील 30 वर्षीय पुरूष, इंदापूर ठाकरगल्ली येथील 52 वर्षीय पुरूष, कालठण नं. १, जोतीबा मंदीरजवळ 55 वर्षीय पुरूष,कालठण नं. 2, दिवसे वस्ती 30 वर्षीय महिला,93 वर्षीय महिला, निमगाव केतकी जयभवानी चौक येथील 42 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. तर भिगवण ट्रामा केअर सेंटर अंतर्गत पूणे येथील प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये 33 वर्षीय महीलेचा समावेश आहे. तर भिगवण येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट करण्यात आली असुन त्यामध्ये डाळज नं.१,येथील 70 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, खेड येथील 43 वर्षीय पुरूष, भिगवण येथील 2 वर्षीय चिमुकला, मळद येथील 55 वर्षीय महिला, भिगवण येथील 56 वर्षीय महिला, डाळज नं.2 येथील 50 वर्षीय पुरूष, अकोले येथील 25 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय महिला, व अडीच वर्षीय चिमुरडीचा समावेश असल्याची माहीती सुत्रांनी दीली आहे.