Coronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 30 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 500 च्या टप्प्यात

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सुधाकर बोराटे – इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमनाची साखळी तुटण्याचे नाव घेता घेत नाही.तर उलट जास्तीचा कहर सुरू असुन इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या भागात आज रविवार दिनांक 23 आॅगष्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत तीन ठीकाणच्या कोरोना टेस्टमध्ये एकुण 30 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन यामध्ये बारामती येथील खासगी लॅबमध्ये 9, इंदापूर कोविड केअर सेंटर येथे रॅपिड अॅटींजन फास्ट टेस्टमध्ये 13 तर परवा शुक्रवार दिनांक 21 रोजी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या व पूणे येथील प्रयोग शाळेत तपासणी करण्यात आलेल्यापैकी 8 पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने इंदापूर तालुक्यात कोरोनाने कहर केला असुन दिवसागणीक रूग्णांच्या आकड्यात वाढ होत चालल्याने इंदापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इंदापूर तालुक्यातील एकुण 26 जणांनी बारामती येथील खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली असुन त्यामध्ये एकुण 9 पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 17 जण निगेटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील शास्त्री चौक येथील 28 वर्षीय एक पुरूष, तर राजेवलीनगर येथील 74 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे.तर भिगवण येथील 9 वर्षीय चिमुकली,49 वर्षीय महीला व 29 वर्षीय महीलेचा समावेश आहे. बेलवाडी येथील 34 वर्षीय एक पुरूष, 22 वर्षीय एक युवती, व 44 वर्षीय एक पुरूषाचा समावेश असुन लामजेवाडी येथील एका 67 वर्षीय पुरूषासह एकुण 9 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.

इंदापूर येथील कोविड केअर सेंटर येथे फास्ट अॅटिंजन रॅपीड टेस्ट तपासणीमध्ये एकुण 13 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये 13 जण पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूरातील 22 वर्षीय महीला, नरूटवाडी येथील 62 वर्षीय पुरूष, गोखळी येथील 17 वर्षीय युवक, लासुर्णे येथील 4 वर्षीय चिमुकली, वरकुटे खुर्द येथील 48 वर्षीय पुरूषासह काजड बोरी येथील एकाच कुटुंबातील 2 महिण्याच्या लहाण बाळासह 8 जणांचा समावेश असुन त्यामध्ये 27 वर्षीय महीला, 25 वर्षीय महीला, 23 वर्षीय युवक, 25 वर्षीय युवती, 2 वर्षीय चिमुकली, 2 महिण्याचे बाळ, 45 वर्षीय महीला, व 90 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे.

तर दिनांक 21 आॅगष्ट 2020 रोजी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये एकुण 56 संशयीतांचे स्वॅब नमुणे घेण्यात आले होते. सदर स्वॅब हे पूणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचेही रिपोर्ट आज सकाळी प्राप्त झाले असुन त्यामध्ये एकुण 8 जण पाॅझीटीव्ह आढळले असुन 48 जण निगेटीव्ह आले आहेत.यामध्ये पाॅझीटीव्ह रूग्णांचा आकडा दीला आहे परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी गावांची माहीती दीलेली नसुन वरिल सर्व पाॅझीटीव्ह रूग्णांची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुहास शेळके यांनी दीली आहे

इंदापूर तालुक्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू असुन प्रत्येक दीवशी इंदापूर शहरात व तालुक्यात रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे.परंतु कोरोनाची साखळी तुटणे अवघड होत चालले आहे. इंदापूर तालक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या 500 च्या घरात गेली असुन ही स्थीती अशीच राहीली तर परिस्थीती अवघड होणार असल्याने नागकांनी दक्षता घेवुन शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिकारी सुहास शेळके यांनी केले आहे.