खुशखबर ! शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘दुपट्ट’ करण्यासाठी मोदी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध पावले उचलताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावर सतत लक्ष ठेवून असून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे केंद्र सरकारने ध्येय ठेवले आहे. त्यामुळे विविध प्रकारे केंद्र सरकार पावले उचलून याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत.

जर्मनीच्या मंत्र्यांसह नरेंद्र सिंह तोमर यांची बैठक
या योजनेसंदर्भात भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी जर्मनीच्या कृषिमंत्र्यांशी चर्चा केली. नवीन तंत्रज्ञान आणि विविध मदतीकरिता चर्चा देखील केली. जर्मनीच्या कृषिमंत्री जूलिया क्लोकनर यांनी या बैठकीनंतर बोलताना म्हटले कि, जर्मनीकडे आधुनिक अवजारे आणि पीक कापणीनंतर कशा प्रकारे नियोजन करावे याचे तंत्रज्ञान असल्याने भारतीय शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.

उत्पन्न खर्च कमी करण्याचा प्रयत्न
या दोघांनी या बैठकीत विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून 2022 पर्यंत भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. तसेच उत्पन्न वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीसाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्याचे ध्येय देखील सरकारने ठेवले असल्याचे तोमर यांनी म्हटले आहे.

2020 पर्यंत कृषी उत्पादनांचे निर्यात 60 अरब डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याबरोबरच 2020 पर्यंत कृषी उत्पादनांचे निर्यात 60 अरब डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय देखील सरकारने ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेती हा दोन्ही देशांसाठी महत्वाचा घटक असून यामध्ये शेतीच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचे देखील तोमर यांनी सांगितले.

 

Visit : Policenama.com