काय सांगता ! होय, भारतानं फोडल्यानंतर अन् अमेरिकेनं घेरल्यानं चीन गेला रशियाला ‘शरण’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सध्या कोरोनामुळे चीनवर जगातील अनेक देश नाराजी व्यक्त करत आहेत. यातच भारतानेही चीनला अनेक बाबतीत घेरले आहे. कोंडीत पडलेल्या चीन देशाने आता रशियाला शरण जाणे सोयीस्कर मानले आहे. जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी रशियाने चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप केले होते. यात रशियाच्या पानबुडीचे दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होत. याप्रकरणी एका नागरिकाला रशियाने अटक देखील केली आहे.

यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतीन यांना रणनीतिक सहकार्य तसेच संपर्कात राहण्याची अट घातली आहे. मॉस्को आणि बिजिंग हे एकाधिकारशाही तसेच सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहे, असा दावा जिनपिंग यांनी केला आहे.