UN मध्ये भारतानं इम्रान खानला दाखवला ‘आरसा’, पाकिस्तान दहशतवाद्यांना पेन्शन देत असल्याचं सांगितलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर खोटे आरोप केले. त्यानंतर भारताने देखील ‘राइट टू रिप्लाई’ च्या अंतर्गत इम्रान खान यांच्या या आरोपांचा भारताने बुरखा फाडला. इम्रान यांच्या भाषणांतर भारताच्या विदेश सचिव विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तान आणि इम्रान खान यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले कि, इम्रान खान यांच्या भाषणात  घृणा दिसत होती. तसेच ते जगाला चुकीची माहिती देत आहेत. तसेच भारताने इम्रान यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वात ज्युनिअर सदस्य निवडली होती. त्यामुळे इम्रान खान यांना आम्ही जास्त महत्व देत नसल्याचे देखील भारताने यामधून दाखवून दिले.

भारताने दिलेले उत्तर

इम्रान खान यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना विदिशा मैत्रा यांनी म्हटलं कि, जगभरात  केवळ इम्रान खान यांचा पाकिस्तान दहशतवाद्यांना पेन्शन देत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या 130 दहशतवाद्यांना पाकिस्तान पेन्शन देत असून त्यांना विविध सुविधा देखील पुरवीत आहे. 1971 मध्ये पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर अत्याचार केले होते. त्यामुळेच बांगलादेशची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तानात अनेक धर्माच्या नागरिकांना ईश निंदा कायद्यांअंतर्गत त्रास दिला जातो.

मानवाधिकारांच्या गोष्टी करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या देशातील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे. तसेच त्यांनी इम्रान खान यांना प्रश्न विचारला कि, पाकिस्तानमध्ये सूचित केलेले 130 दहशतवादि राहत नाहीत का ? तसेच इम्रान खान यांनी या मंचाचा दुरुपयोग केल्याचा आरोप देखील त्यांनी इम्रान खान यांच्यावर केला. इम्रान यांनी आपल्या भाषणात केलेल्या काही शब्दांच्या वापरामुळे तेथे त्यांची मानसिकता दिसून येते.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटले ?
साधारणपणे  जगभरातील नेत्यांना या ठिकाणी बोलण्यासाठी 15-20 मिनिटांचा वेळ दिला जातो. मात्र पंतप्रधान मोदी यांनी केवळ 17 मिनिटांत आपली बाजू भक्कमपणे मांडली. तर इम्रान खान यांनी तब्बल 47 मिनिटे भाषण केले. त्यांना वेळोवेळी थांबण्याची विनंती करण्यात आली मात्र त्यांनी काहीही न ऐकता भारतावर खोटे आरोप करत राहिले.

इम्रान खानचा खोटारडेपणा
आपल्या भाषणात इम्रान खान याने म्हटले कि, काश्मीर मागील 55 दिवसांपासून बंद आहेत. बंदी उठवल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिंसा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर काही विचार केला आहे का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला.