इम्रान खान यांना भारतात येण्याचे आमंत्रण देणार मोदी सरकार, PAK पंतप्रधान येणार का ?

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी भारतात येण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रण दिले जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या शंघाई सहयोग संघटना (शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ) ची जबाबदारी भारत पार पाडणार आहे. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मोदी सरकार देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याना निमंत्रण पाठवेल. दोनीही देशामध्ये संवाद बंद असताना ही पहिली वेळ असेल जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान एकाच कार्यक्रमामध्ये एका मंचावर दिसतील.

भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान सहसा राज्य प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहतात, तर दोन्ही देशांच्या सरकारांच्या प्रमुखांच्या बैठकीला परराष्ट्रमंत्री किंवा इतर कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांला जबाबदारी दिली जाते. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून SCO साठी कोण येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2001 मध्ये SCO ची स्थापना झाली. याची स्थापना चीन, रशिया, कझाकीस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी मिळून केली होती. दहशतवाद रोखणे तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढविणे हे या संस्थेचे उद्दीष्ट होते. या संघटनेत भारत आणि पाकिस्तानला खूपच उशिराने प्रवेश मिळाला. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना या संघटनेमध्ये समाविष्ठ करून घेण्यात आले.

जून 2019 मध्ये बिश्केक येथे पार पडलेल्या या संघटनेच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दहशतवादविरोधी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स बोलावून सगळ्यांनी एक साथ लढण्याची आवश्यकता असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले होते.

या वर्षी SCO बाबत भारताला संधी मिळाली आहे. नुकतेच SCO चे महासचिव व्लादिमीर नोरोव भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचा अंदाज घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/