भारताने पटकाविले 4 युनेस्को विरासत पुरस्कार, मुंबई ‘अव्वल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सांस्कृतिक विरासत संरक्षणाच्या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या युनेस्को एशिया प्रशांत पुरस्कारामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई अव्वल राहिले आहे. मुंबईतील फ्लोरा फाऊंटन, केनेसेठ इलियाहू सिनेगाग आणि ग्लोरी चर्च या तीन स्थळांना पुरस्कार देण्यात आला आहे. भारतातील चार स्थळांची यावेळी निवड करण्यात आली. त्यातील तीन स्थळे ही मुंबईतील आहेत.

मलेशियातील पेनांग येथे आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्थानातील विक्रम साराभाई पुस्तकालय यांचाही समावेश आहे.

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन हे १८६४ मध्ये उभारण्यात आले आहे. आजही ते मुंबईत येणाऱ्याचे आकर्षण केंद्र आहे. ग्लोरी चर्च या रोमन कॅथीलिक पद्धतीने ३८७ वर्षापूर्वी बांधण्यात आले असून ते भायखळा येथे आहे. १०६ वर्षापूर्वी १९१३ मध्ये त्याची उभारणी पूर्ण झाली होती. या स्थळांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी