संत,साधु, बाबाच्या वेशात फिरतात ‘पाकिस्तानी’ एजंट, भारतीय लष्करानं दिला ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सेनेने आपल्या सैनिकांना नकली बाबा आणि साधूंपासून सावध राहण्याचे आदेश दिले आहेत. साधूच्या वेशभूषेतील हा व्यक्ती पाकिस्तानी एजंट असू शकतात आणि त्यांची गोपनीय माहिती चोरी करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाकिस्तानी एजंट साधूंच्या भूमिकेत येऊन सैनिकांच्या कुटुंबाकडून माहिती चोरी करू शकतात. आपल्या सैनिकांना लष्कराने एक पत्रक काढून सावध केले आहे.

पाकिस्तानी एजंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहून भारतीय सैनिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अनेक महिलांच्या नावे बनावट अकाउंट उघडून हे एजंट भारतीय सैनिकांना आपल्याकडे आकर्षति करण्याचा प्रयत्न करत असतात. आपले फोटो आणि व्हिडीओ किंवा कोणताही खासगी क्षण या सोशल मीडियावर टाकताना सावधानता बाळगण्याचे आदेश लष्कराने आपल्या सैनिकांना दिले आहेत. हा एजंट भारतीय लष्कराची गोपनीय माहिती काढून ती पाकिस्तानला पुरवत असतात.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर लष्कराची माहिती, तसेच लष्करासंबंधी गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा आणि सैन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक देखील मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.

Visit : Policenama.com