6 वर्षांत मंत्री आणि अधिकाऱ्यांना मिळाले 17.74 कोटींचे गिफ्ट्स, कोणाच्या वाट्याला सर्वात महागडं गिफ्ट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मित्र देशांना गिफ्ट म्हणून हत्ती पाठवायचा. त्यानंतर कुटनीतीक संबंधांसाठी आंबे पाठवले जायचे. पण, मागील सात दशकांपासून गिफ्ट देण्याची पद्धत खूप बदलून गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील काही पुढाऱ्यांना भगवत गीता गिफ्ट म्हणून दिली. पण, भारतीय पुढाऱ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून काय मिळते? परराष्ट्र धोरणात गिफ्ट देण्याघेण्याची ही पद्धत मागील सात दशकांपासून सुरु आहे. पीएम मोदींच्या कार्यकाळात 230 भारतीय अधिकाऱ्यांना जवळजवळ 2,800 गिफ्ट्स मिळाले आहेत. हे अधिकारी विविध मंत्रालयातील आहेत. जर हे सगळे गिफ्ट्स बाजारात विकायला काढले तर याची किंमत 17.74 कोटी इतकी होईल. विदेशी दौऱ्यात डेलिगेट्सना मिळालेले हे गिफ्ट्स भारत सरकारच्या ताब्यात असतात. बिझनेस मिंटने याबद्दल त्यांच्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. या गिफ्टमध्ये महागडे घड्याळ, ज्वेलरी, आर्टिफॅक्ट्स आणि गॅजेट्स यांचा समावेश आहे. जून 2014 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत मिळालेल्या 60% गिफ्टसची किंमत 5,000 रुपयांपेक्षा कमी आहे. 3% असे गिफ्ट्स आहेत ज्यांची किंमत 1 लाखाच्या जवळ आहे.

2019 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना 6.7 कोटी रुपये किंमतीचा डायमंड एमराल्ड ज्वेलरी सेट मिळाला होता. या कालावधीतील हे सगळ्यात महागडं गिफ्ट आहे. शक्यतो पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना महागडे गिफ्ट्स मिळतात. 2018 आणि 2019 मध्ये सगळ्यात महागडे गिफ्ट्स मिळाले. 2013 च्या आधीची कोणतीही माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. नरेंद्र मोदींना 2015 मध्ये नेकलेस आणि इयर रिंग्सचा एक सेट मिळाला होता, त्याची किंमत 35 लाख रुपये होती. मंत्री आणि अधिकाऱ्यांना काफ्लिंक्स, क्रोकरीज, पेंटिंग्स, फोटो, शर्टस असे गिफ्ट्स मिळाले आहेत. काही ठिकाणी तर दारूच्या बाटल्या देखील गिफ्ट्स मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदींना मार्बल स्टोनवर काढलेला फोटो आणि त्यावर काढलेली कविता गिफ्ट मिळाली आहे.

सगळ्यात जास्त गिफ्ट्स कोणाला मिळाले?
पीएम मोदींनी 2014 मध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नावावर आत्तापर्यंत 650 पेक्षा अधिक गिफ्ट्स आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव आहे. या गिफ्टबद्दल कोणालाही माहिती दिली जात नाही.

तेवढी किंमत दिल्यानंतर गिफ्ट घरी घेऊन जाता येते
या गिफ्टची बाजारात किती किंमत आहे ती काढली जाते. जर त्या गिफ्टची किंमत 5000 पेक्षा जास्त असेल तर ती किंमत सरकारला द्यावी लागते मगच ते गिफ्ट ज्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला मिळालं असेल त्यांना ते घरी घेऊन जाता येतं. असे गिफ्ट्स नॅशनल म्युझियम मध्ये ठेवले जातात. उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार, 2,770 गिफ्ट्स पैकी 592 गिफ्ट्स मंत्री आणि अधिकारी त्यांच्या घरी घेऊन गेले आहेत. फक्त 3 गिफ्ट्स असे घेऊन गेले ज्याची किंमत 3.52 लाख इतकी होती. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी यांनी 45 हजार रुपये एका कार्पेटसाठी आणि पेंटिंग साठी दिले कारण त्यांना ते गिफ्ट त्यांच्या संग्रही ठेवायचं होतं. एम जे अकबर यांनी देखील कफलिंक्स आणि ज्वेलरी बॉक्स याच किंमतीत घेतलं होतं.