फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय रेल्वेने मागील काही दिवसांपासून बदल केले आहेत. परंतू अनेकदा आपल्याला रेल्वेच्या सुविधेबाबत माहिती नसते. परंतू काही सुविधा अशा आहेत की फक्त 25 रुपये खर्च केल्यानंतर तुमचे 1000 रुपये वाचतील.

भारतीय रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर रुम बूक करण्याची सुविधा देते. या रुम एसी आणि इतर नॉन एसी पर्यायांसाठी सिंगल, डबल बेड आणि शयनकक्षच्या रुपात आहे. विशेष म्हणजे याची सुरुवात फक्त 25 रुपयांपासून होते. फक्त 25 रुपयात तुम्ही रेल्वचा रिटायरिंग रुम बुक करु शकतात.

काय आहे रुम बुकिंगचे रेट कार्ड –
जर तुम्ही तीन तासांसाठी रुम बुक करतात तर तुम्हाला 25 रुपये खर्च येईल.
चार तासांसाठी 40 रुपये
सात तासांसाठी 50 रुपये
10 ते 12 तासांसाठी 60 रुपये
13 ते 15 तासांसाठी 70 रुपये
16 ते 18 तासांसाठी 80 रुपये
19 ते 21 तासांसाठी 90 रुपये
22 ते 24 तासांसाठी 100 रुपये
48 तासांसाठी 200 रुपये

5 रुपयांची सूट मिळणार –
एवढेच नाही तर, यावर रेल्वे तुम्हाला सवलत देखील देते. जर तुम्ही रुम बुकिंग ऑनलाइन करतात तर त्यावर तुम्हाला 5 रुपयांची सूट मिळते.

अशी करा बुकिंग –
1. जर तुम्ही रिटायरिंग रुम बुक करु इच्छित असाल तर, यासाठी तुम्हाला सर्वात आधी IRCTC च्या वेबसाइटवर जावे लागेल.
2. त्यावर तुम्हाला लॉगिंन करावे लागेल.
3. आता पीएनआर नंबर पर्यायामध्ये पीएनआर नंबर टाकावा लागेल.
4. यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार रिटायरिंग रुम किंवा डॉर्मिटरी बुक करु शकतात.

तिकिट रद्द करण्याआधी हे लक्षात ठेवा –
जर तुम्ही चेक इनसाठी 48 तास पहले रिटायरिंग रुम बुकिंग रद्द करतात तर तुम्हाला 20 टक्के रक्कम कापून घेतली जाईल. परंतू तुम्ही चेक इन आधी तुम्ही 24 तास बुकिंग रद्द करतात तर तुमची 50 टक्के रक्कम कापण्यात येईल.
असे असेल तरी या सुविधेचा लाभ कोणीही घेऊ शकत नाही. ज्या प्रवाशांचे तिकिट कंफर्म असेल, फक्त तेच या रिटारयिंग रुमचे बुकिंग करु शकतात. याबरोबरच ही सुविधा देशातील सर्व रेल्वेस्टेशनवर उपलब्ध नाही.

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like