Lockdown :राज्यांमध्ये तापमान वाढ !

पोलिसनामा ऑलनाईन – कोरोनामुळे लॉकडाउन असतानाही काही राज्यांमधील तापमानात वाढ झाली आहे. प्रदूषणाबरोबरच भारताच्या तापमानावर झाला की नाही हे तपासण्यासाठी हवामान शास्त्रज्ञांच्या समूहात अभ्यास सुरू झाला आहे. भारतातील जी राज्ये प्रदूषणासाठी प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी 25 मार्च ते 3 मे दरम्यान तापमानात फारसा बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानच्या काही भागांत तापमानातवाढ दिसून आली आहे. एनसीईपी (नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शन) आणि एनसीएआर (नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फीअर रिसर्च) या अमेरिकन मॉडेलवर आधारित हा अभ्यास आहे.

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, कोलकाता शहरांत सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस अधिक तापमान मोजण्यात आले आहे. पाटणा, बिहार, उत्तर प्रदेशात ते सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअस अधिक मोजण्यात आले. यात पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि परिसरात तापमान अधिक होते. या परिसरात हवेतील प्रदूषण हे सामान्यपणे अधिक असते. कारण या भागांमध्ये असलेले अधिक कारखाने व इतरही अनेक गोष्टी आहेत. तांत्रिकदृष्टया या भागात सूक्ष्म तुषार (एरोसोल्स)चे प्रमाण अधिक आहे.

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्याचा परिणाम भागातील तापमानावर दिसून आल्याचे मत हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. या कालावधीत महाराष्ट्राच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर नागपूर आणि विदर्भातील बर्‍याच भागात तापमानामध्ये फारसा फरक दिसून आला नाही. मात्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकण या परिसरात तापमान दोन अंश सेल्सिअस अधिक होते. लॉकडाउनच्या दुसर्‍या टप्प्यात मात्र तापमानात एक वेगळीच स्थिती दिसून आली. पूर्व भारतासह उत्तर भारतात तापमान सरासरीपेक्षा जवळपास दोन अंश सेल्सिअसने कमी झाले. मात्र, त्याच वेळी गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि परिसरातील काही क्षेत्रात तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक दिसून आले.