मराठवाडा : ताप, खाणे बंद, पाठीवर गाठी, जनावरांमध्ये पसरतोय एक विचित्र आजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात प्राण्यांमध्ये एक विचित्र संसर्गजन्य रोग पसरत आहे, ज्यामध्ये जनावरांच्या पाठीवर मोठ्या गाठी दिसून येत आहे, ताप आणि लूज मोशन येतात आणि मग जनावरे अन्न खाणे बंद करतात. राज्यातील हिंगोली आणि अमरावती जिल्ह्यात प्राण्यांमध्ये लंपी आजाराचे संक्रमण दिसून येऊ लागले आहे. हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामध्ये प्राणी अन्न खाणे पूर्णपणे बंद करतात. संसर्गजन्य रोगामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाचा प्रसार बहुतेक जबड्यांमध्ये होतो. जर या आजाराची लक्षणे दिसून आली तर त्वरित उपचार न केल्यास ते वाढू लागते. रोग वाढल्यानंतर त्यावर उपचार करणे अवघड होते, परिणामी प्राण्यांचा मृत्यू होतो.

शिवाजी लोंढे या शेतकऱ्याने सांगितले की, आमच्या गुरांना एका नवीन विषाणूने ग्रासले आहे, ज्यामुळे शरीरावर गाठी तयार होतात. ताप येतो. तो प्राणी फक्त बसून राहतो, काम करण्याच्या अवस्थेत नसतो आणि चाराही खात नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरकडे नेले असता त्यासाठी कोणतेही औषध नाही. त्यामुळे शेतीची कामे कशी करायच्या, अशी चिंता भेडसावू लागली आहे. पशु चिकित्सक विष्णू गायकवाड यांनी सांगितले कि, या रोगात प्राण्यांच्या शरीरावर गाठी तयार होतात, त्यांना ताप आणि डिहायड्रेशन होते. हा रोग एकत्र राहून पसरतो, त्यामुळे प्राण्यांना एकमेकांपासून दूर ठेवावे लागते.

इतर कोणत्याही प्राण्याचे अन्न दुसऱ्या प्राण्याला देऊ नये. दरम्यान, अद्याप कोणत्याही व्यक्तीमध्ये हा आजार उद्भवलेला नाही. प्राथमिक टप्प्यावर उपचार केल्यास ते नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांना घाबरून जाण्याची गरज नाही. या रोगाबद्दल, राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंड यांनी सांगितले की या आजाराची लक्षणे बहुतेक मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात दिसून येतात. यासाठी कोणतीही लस नाही, परंतु आतापर्यंत असे आढळून आले आहे की या रोगासाठी अँटीबायोटिक्स आणि मलेरिया औषधे प्रभावी आहेत.