‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश म्हणते, ‘ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2018 मध्ये मल्याळम सिनेमा ओरू अदार लवचं गाणं ‘Manikya Malaraya Poovi’ मधून इंस्टाग्रामवर चर्चेत आलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरच्या चाहत्यांना तिच्या बॉलिवूड डेब्युची खूपच उत्सुकता आहे. प्रिया आपला पहिला सिनेमा श्रीदेवी बंगलोमुळे प्रिया सोशलवर चर्चेचा हिस्सा बनली आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच ट्रेलर रिलीज झाला होता. यावरून तेव्हा खूप वादही झाला होता ज्याचा प्रियाला सामना करावा लागला. नुकतेच प्रियाचे काही फोटो सोशलवरून व्हायरल होताना दिसत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये प्रिया खूपच हॉट दिसत आहे. प्रियाने पिंक कलरचा पटियाला सारखाच एक ड्रेस घातला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये प्रिया खूपच हॉट आणि डिफरेंट दिसत आहे. या फोटोची खास बात अशी की, प्रिया आपले अ‍ॅब्ज फ्लाँट करताना दिसत आहे. प्रियाचा हा फोटो इतका छान आहे की, फोटो पाहणारा हा फोटो लाईक केल्याशिवाय राहणार नाही.

प्रियाचा हा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. तब्बल 4 लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला असून अजूनही चाहत्यांकडून हा फोटो शेअर होताना दिसत आहे. या फोटोला प्रियाने खास कॅप्शन दिलं आहे. तिनं फोटोला मराठी कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये प्रिया म्हणते, “ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं.”

isit : Policenama.com