IPL 2022 | आयपीएलच्या मॅचेस मुंबई-पुण्यात होणार का? सौरव गांगुली म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – IPL 2022 | मागील कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर गतवर्षीचे आयपीएल सामने भारताबाहेर खेळवण्यात आले. दरम्यान यंदा 15 व्या हंगामाची तयारी (Indian Premier League 2022) जोरदार सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) IPL च्या नियोजनाचे व्यवस्थित प्रयत्न करीत आहे. दरम्यान, यंदाचा हंगाम भारतात जरी होणार असेल तर महाराष्ट्रात होणार का? याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) महत्वाची माहिती दिली आहे. (IPL 2022)

 

बीसीसीआयने अहमदाबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स या 2 नवीन टीमची भर घातली आहे. त्यामुळे ही स्पर्धा नेहमीपेक्षा आणखी रोमांचक होण्याची शक्यता असणार आहे. तर, ”आम्हाला आयपीएल 2022 पूर्णपणे भारतात आयोजित करायचे आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिली, तर ही लीग भारतातच आयोजित करण्यात येणार असल्याचं,” सौरव गांगुली यांनी सांगितलं आहे. (IPL 2022)

”कोरोनाची प्रकरणे फार वाढत नाहीत, तोपर्यंत आयपीएल भारतात आयोजित केले जाईल. सामना आयोजनाच्या ठिकाणांबद्दल बोलायचं झालं, तर आम्हाला सामने महाराष्ट्रातच आयोजित करायचे आहेत. लीगचे सामने फक्त मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) खेळविले जातील. बाद फेरीसाठी सामन्यांचे ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.” अशी माहिती देखील सौरव गांगुली यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा लीगचे सामने मुंबई आणि पुण्यातच होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- IPL 2022 | bcci looking hosting league matches in mumbai and pune says sourav ganguly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | वानखेडे यांच्या अवमान याचिका प्रकरणात नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

 

RBI Fraud Alert | डिजिटल ट्रांजक्शन करताना राहा सावध, रिझर्व्ह बँकेने दिला इशारा – तुमच्या कमाईवर सायबर गुन्हेगारांचा ‘वॉच’

 

WHO Global Center | जगभरात होणार आयुर्वेदाची वाहवा, अर्थसंकल्पात तरतूद; आता भारतात उभारणार पहिले WHO-ग्लोबल सेंटर

 

RBI Fraud Alert | डिजिटल ट्रांजक्शन करताना राहा सावध, रिझर्व्ह बँकेने दिला इशारा – तुमच्या कमाईवर सायबर गुन्हेगारांचा ‘वॉच’

 

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 2 हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर FIR; कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ

 

Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर व कंत्राटदारावर गुन्हा दाखल; CP अमिताभ गुप्ता यांनी दिली माहिती

 

Bandatatya Karadkar | ‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात’; असं म्हणणार्‍या बंडातात्या कराडकरांचा माफीनामा