इशांत शर्माची पत्नी काँग्रेस नेत्यावर भडकली, खडेबोल सुनावत केलं ‘ब्लॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेता अलका लांबा यांनी भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तवर खालच्या पातळीवर भाष्य केल्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची पत्नी प्रतिमा सिंह चांगलीच भडकली आहे. अलका लांबाने योगेश्वर दत्तसाठी खपूच खालच्या पातळीवरचे शब्द वापरले, त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. एवढेच नाही तर अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील लांबा यांना सुनावले आहे. सोमवारी इशांतची पत्नि प्रतिमा सिंहनेही अलका लांबाला उद्धट असल्याचे म्हणत महिलांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

अलका लांबावर प्रतिमा सिंह संतापली
योगेश्वर दत्तविरुद्ध अश्लील भाषा वापरल्याबद्दल प्रतिमा सिंह यांनी अलका लांबावर टीका केली. त्यांनी ट्विट करून म्हटले की, तुमचे विचार तुमची ओळख करून देत आहे. तुमची ओळख अशी आहे की, तुम्ही अत्यंत उद्धट महिला आहात आणि तुम्ही महिलांना अपमानित केले आहे. योगेश्वर दत्तविरोधात काहीही बोलण्यापूर्वी हे माहित करून घ्या की ते भारताचा अभिमान आहे आणि कोणताही भारतीय त्यांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही माफी मागा. असे ट्विट करून प्रतिमा सिंह यांनी अलका लांबा यांना ब्लॉक केले आहे. प्रतिमा सिंह या भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या खेळाडू आहेत.

अलका लांबा ट्रोल का होत आहे
काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी 5 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावेळी त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांनी संघाचा पोशाख घातला होता. यानंतर अलका लांबा यांनी संघ आणि भाजपविरुद्ध शिवीगाळ केली. योगेश्वर दत्तने अलका लांबाला चोख प्रत्युत्तर दिले. यावर प्रत्युत्तर देताना अलका लांबा चिडल्या आणि त्यांनी योगेश्वर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. तेव्हापासून योगेश्वरच्या चाहत्यांनी अलका लांबा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.