निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवार बनला ‘रंगेल’ सरपंच, केला हवेत गोळीबार अन् बारबालांसोबत ‘अश्लील’ डान्स (व्हिडीओ)

जयपूर : वृत्तसंस्था – एका रंगेल सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजस्थानमध्ये सध्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून याच दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. राजस्थानमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा बुधवारी पाडला. पहिल्या टप्प्यात सरपंच निवडणूकीत विजयी झाल्यानंतर एका सरपंचाने सिलेब्रेशन साजरे केले. याच दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 17 जानेवारी रोजी निकाल घोषीत करण्यात आला. निकाल घोषीत होताच विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. अशाच एका सेलिब्रेशनमध्ये एक तरूण कारवर चढून नाचताना दिसत आहे. त्यात त्याच्याबरोबर असलेला एक तरुण हवेत गोळीबार करत डिस्को करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ धैलपूर जिल्ह्यातील राजखेडा परिसरातील आहे. याच परिसरातील ग्रामपंचायत चौहान पुरा रामसिंह पुरा गावचा हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण वाहनावर चढून हवेत गोळीबार करत डान्स करताना दिसत आहे. तर दुसरी व्यक्ती बारबालांसोबत डान्स करत नोटांची उधळण करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने संबंधितांवर तातडीने कारवाई केली. पोलीस या व्हिडीओतील तरुणाचा शोध घेत आहेत. पोलीसनामा व्हिडीओ व्हायरल होत असल्याची पुष्टी करत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like