काश्मीरी मुलीवर ‘अंदाधूंद’ गोळीबार करणार्‍या ‘लष्कर’च्या ‘टॉप’च्या दशहतवाद्याचा सैन्याकडून ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा सर्वोच्च दहशतवादी आसिफ मकबूल भट ठार झाला आहे. पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफने नुकताच सोपोर येथे एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबावर गोळीबार केला होता, त्यात तीन कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाची एक मुलगीही आहे. सोपोरमध्येच त्यांनी शफी आलम नावाच्या परप्रांतीय मजुरावर गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी माध्यमांना सांगितले, ‘गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आसिफला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. जेव्हा आम्ही त्याला घेरले तेव्हा त्याने आमच्यावर हल्ला केला, आमच्यावर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात आमचे काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.त्यासोबत ते म्हणाले, ‘दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी आता भडकाऊ पोस्टर्स वितरीत करीत आहेत,  त्याशिवाय दहशतवाद्यांनी लोकांसोबत मारहाण केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like