जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला हिजबुलचा कमांडर, पोलिसांनी म्हणाले – ‘डोडा जिल्हा दहशतमुक्त’

अनंतनाग : पोलीसनामा ऑनलाइन –  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज सकाळी सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर अनंतनागच्या कुलचोहर परिसरात चकमक सुरू झाली होती. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन लष्कर ए तैयबाचे दहशतवादी आणि एक हिजबुलचा कमांडर मसूद अहमद भट्ट आहे. मसूद, हा डोडा जिल्ह्यातील एकमेव दहशतवादी होता, जो जिवंत होता.

मसूदच्या मृत्यूनंतर पोलिसांनी म्हटले की, आता डोडा दहशतमुक्त परिसर झाला आहे. दहशतवाद्यांकडे एके-47 सह अनेक घातक शस्त्र सापडली आहेत. चकमक संपली आहे, सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.

सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हे संयुक्त ऑपरेशन पार पाडले. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी दहशवादाच्या उच्चाटनासाठी ऑपरेशन सुरू केले आहे. यामहिन्यात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त टीमने एक डझनपेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारले आहे. शोपिया, अवंतीपोरासह अनेक भागात हे आपरेशन जारी आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मागच्या शुक्रवारी दावा केला की, पुलवामा जिल्ह्याच्या त्राल क्षेत्रात हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांची उपस्थिती नाही. 1989 मध्ये खोर्‍यात दहशतवाद पसरल्यानंतर प्रथमच असे झाले आहे की, त्राल दहशतमुक्त झाले आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्रालच्या चेवा उलार परिसरात सुरक्षा दलांच्या सोबत रात्रभर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर पोलिसांनी हा दावा केला होता.

याबाबत सांगताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) विजय कुमार यांनी ट्विटरद्वारे म्हटले की, आजच्या यशस्वी अभियानानंतर त्राल क्षेत्रात आता हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांची उपस्थिती नाही. हे 1989 च्यानंतर प्रथमच घडले आहे.

भारतात मानवी तस्करीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र गट सरळपणे सरकार विरोधी कारवाया करण्यासाठी 14 वर्षांच्या पेक्षा वयाच्या किशोरवयीन मुलांचा वापर करत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचा ”2020 ट्रॅफिकिंग इन पर्सन” रिपोर्ट अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी मागच्या गुरूवारी जारी केला होता. यामध्ये म्हटले आहे की, माओवादी गटांनी शस्त्र आणि आयईडी सांभाळण्यासाठी खासकरून छत्तीसगढ आणि झारखंडमध्ये 12 वर्षापर्यंतच्या मुलांनासुद्धा जबरदस्तीने भरती केले आणि कधी-कधी मानवी ढाल म्हणून त्यांचा वापर केला.