‘बुमराह बच्चा’, त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूनं तोडले अकलेचे ‘तारे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहची ओळख आहे. बुमराह हा फलंदाजांवर वेगवान मारा करणारा भारताचा महत्वाचा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणे असो किंवा भारताकडून विदेश दौऱ्यावर जाऊन खेळणे असो बुमराह नेहमीच आपल्या वेगवान माऱ्यासह फलंदाजांना जेरीस आणतो. मात्र बुमराहची ही खेळ बहुदा एका पाकिस्तानी खेळाडूला आवडलेली नसावी म्हणून त्याने बुमराबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक म्हणतो, माझ्या कारकिर्दीच्या वेळी जर बुमराह असता तर मी चांगलीच फटकेबाजी केली असती. मी अनेक गोलंदाजांविरोधात फलंदाजी केली आहे. मला बुमराचे कौतुक सांगू नका माझ्या विरोधात जगातील अनेक सर्वोत्तम गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. जर बुमराह माझ्यावेळी असता तर कामगिरीचे दडपण त्याच्यावर असते.

मी माझ्या काळात ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम यांच्या सारख्या गोलंदाजांसमोर खेळलो आहे. माझ्यासाठी बुमराह एकदम ‘बच्चा’ आहे, मी तर त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती असे अब्दुल रज्जाक म्हणतो.

जसप्रीत बुमराची गोलंदाजी काहीशी वेगळी आणि विचित्र आहे त्यातच चेंडूचा योग्य वापर कसा करावा याचे त्याला ठाऊक आहे. त्यामुळे तो खूप परिणामकारक गोलंदाजी करतो. मात्र माझ्या काळात मी अनेक प्रतिभावान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे जर त्या काली बुमराह असता तर त्याच्यावरच दडपण आले असते आणि मी त्याच्या गोलंदाजीवर सहज चौकार षटकार ठोकत फटकेबाजी केली असती असे अब्दुल रज्जाक म्हणतो.

Visit : Policenama.com